- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-नुतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज (वडसा) हिन्दी भाषिक अल्पसंख्याक संस्था द्वारे संचालीत आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथे शासनाच्या वतीने १३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान स्वातंत्र्याचा महोस्तव या अभियना अंतर्गत “हर घर तिरंगा” उपक्रम रबविण्याच्या अनुषंगाने आज,दिनांक- १३ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला.या वर्षीचे राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा बहुमान एचएससी फेब्रु.२०२४ परिक्षेमधे आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम व तालुक्यामधून कला शाखेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सिद्धार्थ ऋषी रामटेके याला मिळाले. ध्वजारोहण झाल्यानंतर मानवंदना,राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रतिज्ञा म्हणून मोठ्या उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला.ध्वजारोहण सोहळ्याला
प्राचार्य तथा मुख्याध्यापक प्रा.डी.डी.शिंगाडे, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस.पी. प्रधान,पर्यवेक्षिका श्रीमती डी. व्ही. चव्हाण,कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीगण बहुसंखेने उपस्थित होते.
- Advertisement -

