Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदेशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या 'अर्थभास्करास' अखेरची मानवंदना.. - डॉ.मनमोहन सिंग यांचे शासकीय...

देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या ‘अर्थभास्करास’ अखेरची मानवंदना.. – डॉ.मनमोहन सिंग यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या या ‘अर्थभास्करा’ ला अखेरची मानवंदना देण्यासाठी देशभरातील नेते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी उपस्थित होती.जगातील नेत्यांनीही डॉ.सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत निधन झाले.दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज,शनिवार २८ डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले.देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू,पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी,राहुल गांधी,मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!