- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळ काल गुरुवारच्या रात्री भीषण अपघाताची घटना घडून एका ३२ वर्षीय तरुणाचा करून अंत झाला.अक्षय मधू नान्हे वय ३२ वर्षे,रा.नेरला,ता.पवनी,जि.भंडारा असे मृतक तरुणाचे नाव असून तो दुचाकीचा पेट्रोल संपल्याने दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभा असतांनाच सदरची घटना घडली.
पवनी तालुक्याच्या अड्याळ गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरला येथील अक्षय नान्हे हा काल गुरुवारच्या रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान दुचाकीचे पेट्रोल संपल्याने अड्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळील रस्त्याच्या कडेला उभा होता. अक्षय सोबत एक सहकारी असल्याने त्याला पेट्रोल आणण्यासाठी जवळच्या पंपावर पाठवले होते.या दरम्यान,विरूध्द दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने अक्षयला जोरदार धडक देऊन दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरफटत नेले.यात अक्षयला गंभीर मार लागला.अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अक्षयला तात्काळ अड्याळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र,रात्रीच उपचार सुरू असतांनाच अक्षयची प्राणज्योत मालवली.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

