Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजदुःखद निधन..! देसाईगंज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू...

दुःखद निधन..! देसाईगंज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल,गुरुवार दिनांक-२८ नोव्हेंबरच्या सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सतीश ठाकरे,अंदाजे वय ३७ वर्षे,हल्ली मुक्काम अंबानी फटाका सेंटरच्या मागे शिवाजी वार्ड,देसाईगंज असे मृत पावलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
सतीश ठाकरे हे गेल्या अडीच वर्षांपासून देसाईगंज पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.मनमिळावू स्वभाव व सर्वांशी हसमुखाने बोलून आपले कर्तव्य बजवायचे.अशातच बुधवारी २७ नोव्हेंबरला ठाकरे यांनी रात्री ८ वाजेपर्यंत कर्तव्य बजावून देसाईगंज शहरातील वास्तव्यास असणाऱ्या खोलीवर गेले.ते त्यांची पत्नी व चिमुकल्या मुलीसह एकत्र राहायचे.घटनेच्या दिवशी पत्नी मुलीसह  परीक्षेचे पेपर सुरू असल्याने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे सतीश ठाकरे हे घरी एकटेच वास्तव्यास होते. सकाळच्या सुमारास ठाकरे हे दररोज घरासमोरील रस्त्याची सफाई करून,त्यावर पाणी मारायचे.मात्र, काल गुरुवारच्या सकाळी दररोज होणारी दिनचर्या दिसून न आल्याने शेजारी असलेल्या नागरिकांनी खोलीवर जाऊन बघितले.खोलीवर जाऊन बघितले असता,समोरील दार उघडे दिसून आले.त्यातच शेजाऱ्यांनी आवाज देऊनही ठाकरे यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने आतमध्ये जाऊन बघितले. आतमध्ये गेल्यानंतर ठाकरे हे झोपलेल्या स्थितीत आढळून आले.शरीराची कुठलीही हालचाल होत नसल्याने काहींनी शरीरास हात लावून बघितले असता,शरीर थंड पडलेला होता.त्यामुळे उपस्थित नागरिकांनी तात्काळ देसाईगंज पोलीस ठाण्यास संपर्क साधाला.त्यानुसार देसाईगंज पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत ठाकरे यांना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले.शवविच्छेनानंतर सतीश ठाकरे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.देसाईगंज पोलीस प्रशासनाने कार्यवाही करीत सतीश ठाकरे यांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून आज,शुक्रवारी त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!