- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-घरी कुणीही नसल्याची संधी साधून दारूच्या नशेत एका ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपी तरुणाच्या भिवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.सदरची घटना भिवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मानोरा येथे महिलेच्या तक्रारीनंतर उघडकीस आली आहे.घटनेच्या रात्री पिडीत महिला घरी एकटीच होती.तरुणाने दारूच्या नशेत घरात प्रवेश करीत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.तिचा मुलगा घरी येताच तरुणाने पळ काढला.चंद्रशेखर जयपाल उके वय ३५ वर्षे,रा.मानोरा,ता.भिवापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पीडित ४० वर्षीय महिला पतीच्या निधनानंतर तिच्या मुलासोबत मानोरा येथे राहते.तिचा मुलगा बाहेर गेल्याने घरी एकटीच होती. त्यातच चंद्रशेखरने दारूच्या नशेत तिच्या घरात प्रवेश केला आणि बळजबरीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.तिने बचावासाठी आरडाओरड केली. मात्र,पाऊस पडत असल्याने ओरडण्याचा आवाज कुणालाही ऐकू गेला नाही.त्याचवेळी तिचा मुलगा घरी येताच त्याच्या मोटारसायकलच्या आवाजामुळे चंद्रशेखर बाहेर आला आणि त्याला पाहताच पळून गेला.पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करताच सदर प्रकरण उजेडात आले.प्रकरणी भिवापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची नागपूर शहरातील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार अजित ठाकूर करीत आहेत.
- Advertisement -

