Tuesday, July 21, 2026
Homeनागपूरदहावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल.. - विषारी द्रव्याची पुडी प्राशन करून आत्महत्या..

दहावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल.. – विषारी द्रव्याची पुडी प्राशन करून आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर देण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याने अभ्यास न झाल्याने परीक्षेत उत्तीर्ण न होण्याची मनात भीती बाळगून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना काल शनिवारी १ मार्चला सकाळी नागपूर जिल्ह्याच्या कुही बसस्थानकावर उघडकीस आली.
आर्यन विजय लुटे वय १७ वर्षे,रा.आकोली,ता.कुही, जि.नागपूर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.काल शनिवारी त्याचा १० वीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता.अभ्यास न झाल्याने आपण उत्तीर्ण होणार नाही,या भीतीने तांदळाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी द्रव्याची पुडी त्याने प्राशन केली आणि पाणी प्याला.यातच त्याला काही वेळाने अस्वस्थता वाटू लागली.सदरची बाब त्याच्या मित्राच्या लक्षात येताच मित्राने आर्यनच्या घरी कळवली.त्याला ग्रामीण रुग्णालय कुही येथे उपचारार्थ भरती करण्यात आले.माहिती मिळताच आर्यनचे वडील विजय लुटे, माजी सरपंच गजानन धांडे यांनी लगेच कुही येथे धाव घेतली.कुही ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात रवाना केले.नागपूर मेडिकल रुग्णालयात पोहोचताच त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू आहे.
अभ्यासात मागे पडला आणि आत्महत्येचे पाऊल👇
आर्यन हा कुही शहरातील ऋख्खडाश्रम विद्यालयाचा विद्यार्थी होता.गेल्या वर्षी मार्च २०२४ च्या परीक्षेत तो नापास झाला.शासनाच्या नियमानुसार एटीकेटी घेऊन त्याने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ११ वीत प्रवेश घेतला होता.परंतु,त्यासाठी दोन परीक्षेत मागे राहिलेल्या विषयात पास होणे गरजेचे होते.त्याअनुषंगाने तो सप्टेंबर महिन्यातील पूरक परीक्षेस बसला होता.परंतु, पेपरच्या दिवशी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याचा इतर गावांशी व उमरेड सारख्या शहराशी संपर्क तुटला होता.परिणामी,तो उमरेडला परीक्षेसाठी जाऊ शकला नव्हता.त्यामुळे,  अभ्यासात मागे पडला आणि आत्महत्येचे पाऊल उचलले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!