Wednesday, July 29, 2026
Homeनागपूर'त्या' तीन वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू चिकन खाल्ल्यानेच..

‘त्या’ तीन वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू चिकन खाल्ल्यानेच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली होती.डिसेंबरमध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवले होते.या प्राण्यांचा मृत्यू एच-५एन-१(बर्ड फ्ल्यू) विषाणूमुळे झाल्याचा अहवाल राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानने दिला.तीनही वाघ तीन ते चार वर्षाचे होते.तर बिबट्या ७ ते ८ महिन्यांचा होता.वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघांना उपचारासाठी आणण्यात आले होते.हे तीनही वाघ मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांमुळे बंदीस्त करण्यात आले होते. वाघ डिसेंबर २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूरातील टीटीसीतून, तर बिबट बुलढाण्यातून मे २०२४ मध्ये आला होता; पण उपचारादरम्यान तीन वाघ आणि एका बिबट्याचा २० ते २३ डिसेंबरदरम्यान मृत्यू झाला.वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवण्यात आले. प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल १ जानेवारी २०२५ रोजी समोर आला होता.वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे या अहवालात म्हटले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!