Saturday, June 13, 2026
Homeदेसाईगंज'त्या' कर्मचाऱ्यांना रेती तस्करांनी शिवीगाळ करीत झोडपले.. - अधिकाऱ्यांनी साधली चुप्पी; देसाईगंज...

‘त्या’ कर्मचाऱ्यांना रेती तस्करांनी शिवीगाळ करीत झोडपले.. – अधिकाऱ्यांनी साधली चुप्पी; देसाईगंज तालुक्यातील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याने तसेच शासनाच्या महसूलास कोट्यवधी रुपयांचा चुना लागत असल्याने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अवैध रेती वाहतूक व उत्खनाला आळा  घालण्यासाठी चेकपोस्ट निर्मिती केली असून सदरच्या चेकपोस्टवर ईटीपी तपासणी बंधनकारक करून चेकपोस्टवर हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने काही कां असेना,जिल्ह्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीवर थोडाफार तरी आळा बसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.अशातच ज्यांना अवैध रेतीची चोरी केल्याशिवाय दुसरे पर्यायच उरलेले नाही,अश्या  मुजोर रेती तस्करांचा कारनामा देसाईगंज तालुक्यात चर्चेचा विषय ठरू लागला आहे.रेती चोरीचा अन् शिवीगाळ करून झोडपल्याचा मामला असल्याने
याची वाच्यता कुठेही झाली नसली तरीही ‘चोर मचाये शोर’ मुळे प्रकरणास वाचा फुटली आहे.वाचा तर फुटली,मात्र प्रकरणात अधिकाऱ्यांनी चुप्पी साधल्याने खालच्या कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असल्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,देसाईगंज तालुक्याच्या एका छोट्या गावातील रेती घाटावर बुधवार २ एप्रिलच्या मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या दरम्यान,चार ते पाच ट्रॅक्टर अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करीत असल्याची माहिती एका विभागातील काही कर्मचाऱ्यांना गुपितरित्या मिळाली.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सिने स्टाईलने अवैध रेती उपसा करणाऱ्या घाटावर धाड टाकली.धाड तर टाकली,पण रेती तस्करी करणारे ‘या आणि आम्हाला पकडा’ असे म्हणणार तर नाही,त्यातच काही मुजोर रेती तस्करांनी  कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत झोडपले.मध्यरात्रीची घटना असल्याने याबाबत कुठेही वाच्यता झाली नाही.पण ‘दिवालीलाही कान असतातच’ या म्हणीप्रमाणे हळूहळू घडलेला प्रकार उघडकीस येऊ लागला आहे.अशातच सदर घटनेबाबत आज,शुक्रवार ४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास देसाईगंज पोलीस ठाण्यात माहिती घेतली असता,अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने याचे नवल वाटत आहे.त्यामुळे ‘हम करेसो कायदा पास’ याची प्रचिती सदर प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येत असल्याने रेती तस्करांची आणखीनच मुजोरी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!