Saturday, August 8, 2026
Homeभंडारातीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; नागरिकांचा संताप.. -नराधम आरोपीचे वकीलपत्र न...

तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; नागरिकांचा संताप.. -नराधम आरोपीचे वकीलपत्र न घेण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर एका ३० वर्षीय नराधमाने सार्वजनिक शौचालयात अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात संतापाचा भडका उडाला आहे.घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज शुक्रवारी संपूर्ण शहरात ‘भंडारा बंद’ ची हाक देण्यात आली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदरची घटना ही काल गुरुवारच्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भंडारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात घडली.रोहित वासनिक वय ३० वर्षे, रा.भंडारा असे आरोपीचे नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.
आरोपीने एका तीन वर्षीय चिमुकलीला परिसरातील सार्वजनिक शौचालयात नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.मात्र,घाबरलेल्या चिमुकलीने आरडाओरड करताच नागरिकांनी तात्काळ शौचालयाकडे धाव घेतली आणि आरोपी रोहित वासनिक याला रंगेहाथ पकडले. संतापाच्या भरात जमावाने नराधमाला जागेवरच बेदम मारहाण केली.जमावाच्या या मारहाणीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि सुटण्यासाठी आरोपीने तिथे पडलेल्या एका टाइल्सच्या तुकड्याने स्वतःलाच मारहाण करत जखमी करून घेतले.या घटनेनंतर जखमी चिमुकलीला आणि मारहाणीत जखमी झालेल्या आरोपीला उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.मात्र,या घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच शेकडो संतापलेले नागरिक रुग्णालयाबाहेर गोळा झाले. “या नराधमावर कोणतेही उपचार करू नका,त्याला आमच्या स्वाधीन करा,” अशी आक्रमक भूमिका घेत जमावाने रुग्णालयातच ठिय्या दिला.सलग सात तास चाललेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमुळे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान,परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी शहर पोलीस,राखीव दल आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधून अतिरिक्त कुमक तातडीने तैनात करण्यात आली.वाढता तणाव लक्षात घेता,प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक मोरे,उपविभागीय अधिकारी तिखे आणि मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.दुधगावकर यांनी संतप्त जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.आरोपीवर कठोर कलमांन्वये कारवाई केली जाईल आणि त्याला कडक शिक्षा मिळवून दिली जाईल,असे ठोस आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास नागरिकांचा राग काहीसा शांत झाला.या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ पुकारण्यात आला आहे.शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा आणि दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहेत.या प्रकरणाचा खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालवण्यात यावा आणि भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही वकिलाने या नराधम आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये,अशी आक्रमक मागणी भंडारावासीय जनतेकडून करण्यात येत आहे.प्रकरणाचा पुढील सखोल तपास भंडारा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!