Sunday, May 31, 2026
Homeब्रम्हपुरीतीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आढळला जंगल परिसरात..

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आढळला जंगल परिसरात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-गावशेजारी असलेल्या जंगल परिसरात अंगण झाडण्याच्या झाडण्या तोडण्यासाठी गेलेल्या एका वृध्द महिलेचा तब्बल तीन दिवसांनी जंगल परिसरात चक्क छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही ब्रम्हपुरी तालुक्याच्या पद्मापूर गाव परिसरात आज,शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.यमुना बाजीराव मडावी वय ७० वर्षे,रा.पद्मापूर,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे मृतक वृध्द महिलेचे नाव आहे.
यमुना मडावी ह्या तीन दिवसांपूर्वी गावशेजारी असलेल्या जंगल परिसरात अंगण झाडण्याच्या झाडण्या तोडण्यासाठी गेल्या होत्या.सकाळपासून गेलेल्या यमुना मडावी घटनेच्या दिवशी रात्र होऊनही घरी परतल्या नसल्याने घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली.मात्र,त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता. अश्यातच आज शुक्रवारच्या सकाळी काही नागरिकांना जंगल परिसरात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह दिसून आला.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली.लागलीच घटनेची माहिती ब्रम्हपुरी वनविभागास देण्यात आली.वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला.मृतदेहाच्या पाहणीवरून वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.प्रकरणी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालावरून नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!