Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीवैयक्तिक तक्रारी थेट जिल्हास्तरावर मांडण्याची संधी..!

वैयक्तिक तक्रारी थेट जिल्हास्तरावर मांडण्याची संधी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,बुधवार ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात करण्यात येणार आहे.लोकशाही दिन हा नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक तक्रारी थेट जिल्हास्तरावर मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक व्हावा तसेच प्रलंबित तक्रारींवर त्वरित कार्यवाही व्हावी,या उद्देशाने दर महिन्याला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
ज्या तक्रारदारांना जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा आहे,त्यांनी संबंधित तक्रार प्रथम तालुका स्तरावरील लोकशाही दिनात मांडलेली असणे आवश्यक आहे.तालुका स्तरावर तक्रारीचे निराकरण होऊन प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यासच संबंधित तक्रारदारास जिल्हास्तरावर अर्ज सादर करता येईल. अर्जासोबत तहसिलदारांच्या उत्तराची प्रत तसेच तालुका लोकशाही दिनाच्या टोकन क्रमांकाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
सदर अर्ज विहित नमुना प्रपत्र १ (ब) मध्ये भरून अर्जाची आगाऊ प्रत जोडून सादर करावे.तसेच तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक असून अन्य प्रकारचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शासनाने निर्धारित केलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून लोकशाही दिनाच्या माध्यमातून त्यांच्या तक्रारींवर तातडीने व प्रभावी कार्यवाही करता येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!