- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरातील दोन अल्पवयीन मुली मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असून पालकांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात मीसिंगची तक्रार दाखल केल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून बल्लारपूर पोलिसांनी शोध सुरू केला आहे.पहिल्या घटनेत १९ ऑक्टोंबर २०२५ च्या रात्री १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरीच होती.रात्री आपल्या आजीला बाथरूमला घेऊन गेली.नंतर आपल्या खोलीत गेली.मात्र,सकाळच्या सुमारास ती आपल्या खोलीत आढळली नसल्याने कुटुंबीयांनी याबाबत २० ऑक्टोंबरला बल्लारपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.दुसऱ्या घटनेत बल्लारपूर शहरातीलच एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १३ ऑक्टोंबरपासून बेपत्ता असून ती कॉलेजमध्ये जाते म्हणून घरून निघाली.मात्र,त्या दिवशीपासून घरी परतलीच नाही.कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली; पण ती कुठेही आढळून न आल्याने अखेर कुटुंबीयांनी १९ ऑक्टोंबरला पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
- Advertisement -

