- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-डोक्यातील सर्व रोग परवडणारे आहेत; मात्र,एकदा कां संशयाचा भूत डोक्यात संचारला तर काहीही केलं तरी तो पिच्छाच सोडेना..! त्यामुळे त्यापासून चार हात दूर राहिलेलं बरं.अशातच नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाभा येथे प्रियकराच्या डोक्यात संशयाचा भूत संचारला आणि तीन वर्षांपासून जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केली.२६ वर्षीय अक्षय प्रभाकर दाते असे प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.तर हेमलता किशोर वैद्य वय ३२ वर्षे,एकांशी सोसायटी,दाभा असे मृत तरुणीचे नाव आहे.दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सवालीवाघ येथील रहिवासी होते.
हेमलता आणि अक्षय यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.दोघेही कामानिमित्त नागपुरात आले होते.हेमलता ही एकांशी सोसायटीतील पीस रेसिडेन्सी येथे रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती.तर अक्षय हा बिग बास्केटमध्ये नोकरी करत होता.दोघेही विवाह बंधनात अडकणार होते. अशातच काही दिवसांपासून अक्षयच्या डोक्यात संशयाचा भूत संचारला होता.त्यामुळे तो थोड्या- थोड्या गोष्टीसाठी तिच्याशी वाद घालायचा व इतर कुणाशी हेमलताचे चक्कर तर नाही ना विचारात पडला होता.मंगळवारी अक्षय सोसायटीत गेला असता हेमलता ही एका व्यक्तीशी बोलत होती.त्यामुळे अक्षयने तिच्याशी वाद घातला.वादाचे अवसान डोक्यात गेले व त्याने हेमलताच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला व घटनास्थळावरून पळून गेला.सोसायटीतील नागरिकांनी पीस रेसिडेन्सीचे बिल्डर अभिषेक केवलरामानी यांना याची माहिती दिली व नागरिकांनी हेमलताला मेयो इस्पितळात घेऊन गेले.मात्र,उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आणि तीन वर्षाचे प्रेमसंबंध एका झटक्यात खतम झाले.पळून गेलेला आरोपी अक्षयला अमरावती येथून अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

