Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरठाणेदाराची उचलबांगडी; पोलिस उपनिरीक्षकाचे लाच प्रकरण भोवले...

ठाणेदाराची उचलबांगडी; पोलिस उपनिरीक्षकाचे लाच प्रकरण भोवले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठाण्यांपैकी एक ठाणे म्हणून बल्लारपूर ठाण्याची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष रुची असते. अशातच मागील सहा महिन्यांपूर्वी बल्लारपूर पोलिस ठाण्याची धुरा हाती घेतलेल्या सुनील गाडे यांची पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी तडकाफडकी बदली केली.त्यांच्या जागी श्याम गव्हाणे यांनी काल बुधवारी बल्लारपूर ठाण्याची सूत्रे स्वीकारली.दोन दिवसांपूर्वी बल्लारपूर येथील पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.ठाणेदार गाडे या प्रकरणाचा बळी ठरल्याचे बोलल्या जात आहे.विशेष म्हणजे मागील वर्षभरात या ठाण्यात तीन ठाणेदार बदलले आहेत. फेब्रुवारी २०२४ रोजी आसिफ राजा शेख यांनी बल्लारपूर ठाण्याची सूत्रे हाती घेतली होती.त्यानंतर कामकाज सुरू केले. काही प्रकरणांचा त्यांनी छळाही लावला होता.
बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण घडताच त्यांची चार महिन्यांत रामनगर ठाण्यात बदली करून रामनगरचे ठाणेदार सुनील गाडे यांच्याकडे बल्लारपूरची सूत्रे देण्यात आली.मात्र मंगळवारी त्याची तडकाफडकी बदली करून श्याम गव्हाणे यांच्याकडे सूत्रे देण्यात आली.त्यामुळे पोलिस प्रशासन सुरळीत होईल,असे वाटत होते. बल्लारपूर ठाण्यातील पीएसआयने घेतलेल्या लाच प्रकरणातून त्यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात असले तरीही बल्लारपुरात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारावरही गडचिरोलीत लाचलुचपत विभागाची कारवाई झाली आहे.त्यामुळे या बदलीबाबत पोलिसांत चर्चा रंगत आहेत.बदलीच्या काही कारणांचीही कुजबूज सुरू झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!