- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-लाकूड कटाईची कामे आटोपून ट्रॅक्टरद्वारे परतीच्या वाटेवर असणाऱ्या मजुरांवर काळाने झडप घातल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला,तर दोघेजण गंभीर जखमी व दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना आज,गुरुवार १५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्याच्या गोगाव-सायगाव मार्गावर घडली.अपघातात प्रवीण प्रकाश भोयर वय ३० वर्षे व शिवाजी बळीराम दोडके वय ५० वर्षे दोघेही रा.गोगाव,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर या मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर नीलकंठ रामचंद्र जरादे वय ४२ वर्षे,ब्रम्हदास उरकुडा भजगवळी वय ५० वर्षे अशी गंभीर जखमींची नावे आहेत.तर राहुल माणिक धारणे वय ३५ वर्षे व अलीफ सुधाकर गजबे वय ३० वर्षे अशी किरकोळ दुखापत झालेल्यांची नावे आहेत.
ब्रम्हपुरी तालुक्याच्या गोगाव येथील सात मजूर लाकूड तोडणीच्या कामासाठी ट्रॅक्टरने तळोधी येथे गेले होते.तेथील कामे आटोपून आज गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावाकडे परत निघाले होते. अश्यातच गोगाव-सायगाव मार्गावर येताच धावत्या ट्रॅक्टरचे एक्सल तुटले.यामुळे ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर ट्रॉलीसह मुख्य मार्गाच्या कडेला जाऊन पलटी झाला.यात ट्रॅक्टरवरील दोन मजूर ट्रॉलीखाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाले.तर अन्य मजूर जखमी झाले. घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली.मेंडकी पोलिसांनी घटनास्थळी पोहचत जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.रोजची रोजी- रोटी कमावून खाणाऱ्या मजुरांवर काळाने झडप घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

