Saturday, October 3, 2026
Homeगडचिरोलीआज ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ..

आज ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिमेची प्रभावी सुरुवात केली असून आज,गुरुवार १५ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे या मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे तसेच नगरसेवक शेखर आखाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी सिकलसेल हा केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक प्रश्न असल्याचे नमूद केले. “लोकसहभागातून आणि व्यापक तपासणी व प्रबोधनातूनच सिकलसेल मुक्त गडचिरोलीचे स्वप्न साकार होईल,” असे सांगत त्यांनी नागरिकांना तपासणीस पुढे येण्याचे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी मोहिमेची व्याप्ती गावस्तरापर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले.दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत स्क्रीनिंग पोहोचवून वेळीच निदान व उपचार सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला.
नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर यांनी जनजागृतीची भूमिका अधोरेखित करत सामाजिक स्तरावर व्यापक प्रबोधनाची आवश्यकता व्यक्त केली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी पथनाट्यांतून दिलेला संदेश समाजात पोहोचल्यास सिकलसेल निर्मूलन सहज शक्य असल्याचे सांगितले.आरोग्य यंत्रणा सर्व विभागांच्या सहकार्याने मोहीम यशस्वी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्याचबरोबर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी हायड्रॉक्सी युरिया उपचारांच्या प्रभावी वापरामुळे सिकलसेलमुळे होणाऱ्या गंभीर रुग्णसंख्येत घट झाल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे,जिल्हा सामान्य रुग्णालय नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेली दोन पथनाट्ये.सिकलसेल आजाराची लक्षणे, विवाहापूर्व तपासणीचे महत्त्व, ‘कुंडलीपेक्षा सिकलसेल रिपोर्ट पाहा’ हा समाजोपयोगी संदेश आणि आजारावर मात करण्यासाठी आवश्यक काळजी यांचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थिनींनी केले. या कलाविष्काराबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक करून शाबासकी दिली.
या कार्यक्रमास जिल्हा महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनिष मेश्राम,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे फिजिशियन डॉ.इंद्रजीत नागदेवते,डॉ. प्रशांत पेंदाम व डॉ.प्रफुल गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिकलसेल नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे यांनी केले. ‘अरुणोदय’ मोहिमेची व्याप्ती व उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती त्यांनी दिली. आभार प्रदर्शन जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी, सूत्रसंचालन करणाऱ्या रुचिता सयाम व प्रिया चाचेरे, प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण केंद्र गडचिरोलीच्या मेघा कुळसंगे,नर्सिंग स्कूलची चमू,साई नर्सिंग स्कूलचे प्राचार्य, सिकलसेल समुपदेशक नीता बालपांडे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!