Tuesday, August 18, 2026
Homeभंडाराकष्टकरी खातेदारांच्या रकमेवर पोस्टमास्तरने मारला डल्ला.. - पासबुकवर नोंदी; पण शासनाच्या प्रणालीत...

कष्टकरी खातेदारांच्या रकमेवर पोस्टमास्तरने मारला डल्ला.. – पासबुकवर नोंदी; पण शासनाच्या प्रणालीत नोंदीच नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकाचा अभाव असल्याने अनेकजण गावातील पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढून सुकन्या समृद्धी योजना,बचत खाते,लाईफ इन्शुरन्स वा आरडी अशा विविध योजनांमध्ये रक्कम जमा करीत असतात.पण,ज्या ठिकाणी पैसे जमा करण्यात येतात,अश्या व्यक्तीचा कष्टकरी खातेदारांच्या रकमेवर डोळा असेल तर सर्व स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही.अशीच धक्कादायक घटना नुकतीच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांब येथील पोस्ट ऑफीसमध्ये उघडकीस आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.विशेष म्हणजे, चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोस्टमास्तरने तब्बल १ हजार ६०० खातेधारकांच्या रकमेवर डल्ला मारला आहे.नेमकी किती रुपयांची अफरातफर झाली,याचा आकडा सर्व खातेदारांच्या पासबुकची पडताळणी अंती स्पष्ट होणार आहे.पोस्टमास्तरने खातेदारांच्या पासबुकवर नोंदी घेतल्या खरी,पण शासनाच्या प्रणालीत नोंदीच घेतल्या नाही.रोहित मांढरे असे कष्टकरी खातेदारांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या पोस्टमास्तरचे नाव असून सदर प्रकार उजेडात येताच वरिष्ठ टपाल अधिकाऱ्यांनी त्यास निलंबित केले आहे.महत्वाचे म्हणजे,खातेदारांना गैरव्यवहाराची कुणकुण लागताच ग्राहकांनी पोस्ट ऑफीसकडे धाव घेतल्याने संपूर्ण घोटाळा उघडकीस आला.सदरच्या प्रकारामुळे ग्राहकांनी एखाद्यावर संपूर्ण विश्वास न ठेवता वरिष्ठ स्तरावर शहानिशा करणे आवश्यक आहे.जसे की,एखादी आरडी भरतांना एजंटकडे रक्कम दिली जाते,पण तो एजंट संबंधित बँकेत वा पोस्ट ऑफिसच्या शाखेत रक्कम जमा करतो किंवा नाही,यासाठी महिन्यातून एकदा तरी शहानिशा करून घेणे आजच्या घडीला आवश्यक झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!