Wednesday, October 21, 2026
Homeभंडाराजेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने आज सकाळपासूनच बाधितांनी उपचारासाठी रुग्णालयांकडे धाव घेतली.दरम्यान,घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत.
काल मंगळवारी दुर्गोत्सव आणि दसऱ्यानिमित्त  लाखनी तालुक्यातील खराशी गावात जितेंद्र बोंद्रे यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्रीला जेवण केल्यानंतर आज पहाटेपासून गावातील शेकडो नागरिकांना जुलाब, उलटी आणि मळमळचा त्रास जाणवू लागला.काही नागरिकांना तातडीने खराशी येथील उपकेंद्रात दाखल करण्यात आले.तर काहींना भंडारा आणि पालांदूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या सर्व नागरिकांवर उपचार करण्यात येत असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.मात्र,अनेक नागरिकांची प्रकृती एकाच वेळी खालावल्याने अन्नविषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!