Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजजुनी वडसाच्या पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत क्षयरोगाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम...

जुनी वडसाच्या पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत क्षयरोगाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या जुनी वडसा येथील पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळेत आज,मंगळवार १२ ऑगस्ट रोजी क्षयरोगाबाबत जनजागृतीपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना क्षयरोगाची कारणे,लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच योग्य आहार,स्वच्छता व लसीकरणाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनासाठी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपेक्षा देशपांडे,अप्रेंटिव्ह टीचर यांनी भूषविले.तर प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण,शिक्षक शिवराम हाके,राहुल मस्के,मुजाहिद खा पठाण,शिक्षिका खरकाटे,कुमारी वनिता अढाऊ (समुपदेशिका,ग्रामीण रुग्णालय देसाईगंज)तसेच स्मिता डोंगरे(मार्गदर्शक,टीबी हेल्प विजिटर,ग्रामीण रुग्णालय देसाईगंज)यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांनी केले,तर आभार प्रदर्शन शिवराम हाके यांनी मानले. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सजगता वाढली असून समाजात क्षयरोग प्रतिबंधाचा संदेश पसरविण्यास हातभार लागणार असल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांनी व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!