Friday, October 9, 2026
Homeदेसाईगंजजीवनात कधी काय होणार हे सांगताच येत नाही? विसोरा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास...

जीवनात कधी काय होणार हे सांगताच येत नाही? विसोरा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अनिल आडे यांचे अल्पशा आजाराने निधन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-जीवन हे नश्वर आहे. जीवनात कधी काय होणार? सांगता येत नाही; अख्खे आयुष्य दारू तर दूरच साधी सुपाळीची खांड खाल्ली नाही,कधी कुणाचे वाईट केले नाही; अश्या व्यक्तीस अचानकपणे घरून कर्तव्यावर जात असतांना भोवळ येते आणि रुग्णालयात दाखल करण्यात येते व १५ ते २० दिवसांनी मृत्यूने कवटाळले असल्याची जेव्हा बातमी वाऱ्यासारखी पसरते; त्यावेळी सर्वच जण अवाक् होऊन एकमेकाकडे बघतात तेव्हा..? असाच काहीसा प्रकार देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विसोरा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अनिल आडे यांच्या बाबतीत घडला आणि जवळपास वयाच्या ५२ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे उपचारादरम्यान नागपूर येथे निधन झाले.
अनिल आडे हे विसोरा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून बऱ्याच कालावधीपासून कार्यरत होते.तसेच त्यांच्याकडे कुरुड ग्रामपंचायतीचा गेल्या काही महिन्यांपासून अतिरिक्त पदभार होता.आडे हे कामात प्रॉम्प्ट व्यक्तिमत्वाचे होते.२०२४ च्या आमदारकीच्या विधानसभा निवडणूका पार पडल्या आणि आचारसंहिता २५ नोव्हेंबर २०२४ ला संपल्या. त्यातच २५ नोव्हेंबरला कुरुड ग्रामपंचायत या ठिकाणी सभा असल्याने ते वास्तव्यास असणाऱ्या देसाईगंज येथील निवासस्थानी कर्तव्य बजावण्याकरीता तयारी करीत असतांना घरीच त्यांना भोवळ आली व ते खाली कोसळले.त्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दोन दिवस कोमामध्ये गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. मात्र,काल, मंगळवार १७ डिसेंबरच्या सायंकाळी त्यांची प्रकृती खालावली व सायंकाळी ६.१५ वाजेच्या दरम्यान अनिल आडे यांची नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.आडे हे कोल्हापूर कडील असल्याने आज,बुधवारी १८ डिसेंबरला त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!