Friday, October 9, 2026
Homeगोंदियाएका कुरकुऱ्याच्या पाऊचने घेतला दुसरीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा प्राण..

एका कुरकुऱ्याच्या पाऊचने घेतला दुसरीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा प्राण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका कुरकुऱ्याच्या पाऊचने दुसरीत शिकणाऱ्या चिमुकल्याचे प्राण घेतले असल्याची घटना काहीशी वेगळीच वाटत असल्याने अनेकांना प्रश्न पडला असेल की,कुरकुऱ्याचा पाऊच एखाद्या चिमुकल्याचे प्राण कसे काय घेऊ शकतो? तर हे खरे आहे.अशीच काहीशी घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव येथे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी १६ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली.
हल्ली शाळेच्या परिसरा नजिक,पान टपरी,किराणा दुकान व इतर दुकानांमध्ये लहान मुलांसाठी चॉकलेट, चिप्स,कुरकुरे व इतर खेळणीचे साहित्य असलेली खाद्य पदार्थ सहजासहजी मिळत असतात. सगळीकडेच लहान मुले सर्वात जास्त मोठ्या आवडीने कुरकुरे खातांना दिसून येतात.अशातच घटनेच्या दिवशी इयत्ता दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेला ८ वर्षीय शिवान्स लांजेवार याने कुरकुऱ्याचे पाऊच घेतले.त्यामध्ये त्याला छोटीशी प्लास्टिकचे खेळणे मिळाले.खेळता-खेळता शिवान्सने ते तोंडात टाकले; मात्र ते घश्यात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.सदरची बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्याला लगेच रुग्णालयात नेले; पण रुग्णालयात नेत असतांनाच त्याचा वाटेतच दुर्दैवी
मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!