Wednesday, October 7, 2026
Homeगडचिरोलीथंडीच्या कडाक्याने गारवा; गावखेड्यात शेकोट्या..

थंडीच्या कडाक्याने गारवा; गावखेड्यात शेकोट्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला असून थंडीचा कडाकाही वाढल्याने गावखेड्यात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.जिल्ह्यात सध्या रात्री थंडी,पहाटे वारा आणि दुपारी ऊन असे वातावरण आहे.अशातच सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत सायंकाळी पाच वाजल्यापासून दाट धुके पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.पहाटे तर धुक्याचे प्रमाण जास्त असते. पुढील एक-दोन दिवसांत जिल्ह्यात गारठा आणखीन वाढणार असल्याचे संकेत सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा वाढणार असल्याची शक्यता आहे.शेतपिकासाठी थंडी आवश्यक असते. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थंडीला सुरुवात झाली.त्यामुळे झाडांना पालवी आणि मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.थंडीमुळे उबदार कपड्यांची मागणी तर वाढली; मात्र,कडाक्याच्या थंडीने उबदार कपडेही थंडगार पडू लागले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!