Tuesday, August 18, 2026
Homeमुंबईआईने पोटच्या मुलाला विकले १ लाख रुपयांत...

आईने पोटच्या मुलाला विकले १ लाख रुपयांत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-एका ३२ वर्षीय आईने कारागृहात बंद असलेल्या पतीची जमानत घेण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाला १ लाख रुपयांत विकल्याची घटना उघडकीस आली आहे.प्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुजरात आणि कर्नाटकात पसरलेल्या आंतरराज्यीय बाल तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आठ महिलांसह नऊ जणांना अटक केली आहे.ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात ३२ वर्षीय आईचाही समावेश आहे.या महिलेला कारागृहात बंद असलेल्या आपल्या पतीची जमानत करून घ्यायची होती.त्यासाठी तिने आपल्या मुलाला विकल्याची माहिती समोर आली आहे.महिलेच्या सासूने पोलिसात तक्रार दाखल केल्यावर तिच्या मुलाचा १ लाख रुपयांत विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सुलोचना सुरेश कांबळे वय ४५ वर्षे,मीरा राजाराम यादव वय ४० वर्षे,योगेश भोईर वय ३७,रोशनी घोष वय ३४ वर्षे,संध्या राजपूत वय ४८ वर्षे,मदिना ऊर्फ मुन्नी इमाम चव्हाण वय ४४ वर्षे,तैनाज शाहीन अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!