- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- म्हणतात ना.! कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.जो कायद्याच्या कचाट्यात अडकला,अश्यांचा तिथेच सोक्ष-मोक्ष लागतो.मग तो कितीही धुरंदर व्यक्ती कां असेना.! या ठिकाणी एका रांगेत उभे राहावेच लागते.अश्याच प्रकारे कायद्याचे अभ्यासक, संविधान प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या अधिकाऱ्यांना चक्क कायद्याच्या कटघऱ्यात उभे राहण्यासाठी भाग पाडले असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांसह(एस पी) १३ अधिकाऱ्यांना मंगळवारी २७ मे रोजी नोटीस बजावल्याने एकच खळबळ माजली आहे.प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,विद्यमान पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी शांतनू गोयल, राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, जिवतीचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे,प्रवीण चिडे, अविनाश शेंबटवाड,तहसीलदार रूपाली मोगरकर,वरिष्ठ लिपिक पांडुरंग नंदुरकर,गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव,ठाणेदार कांचन पांडे,कुमार मंगलम बिरला,मनोहर तालेवार आदी १३ अधिकाऱ्यांना जिल्हा न्यायालयाने नोटीस बजावली असून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात येत्या १० जून २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.
प्रकरण 👇
६५ वर्षांवरील वयोवृध्दांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात मरण पावलेल्या लाभार्थ्यांच्या नावाने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला.यात मृत लाभार्थ्यांच्या खात्यावरील रक्कम तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र देऊन बँकेतून विड्रॉल केल्याचे उघडकीस आले होते.जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशानुसार,तहसीलदार रूपाली मोगरकर यांनी याबाबत जिवती पोलिसांत तक्रार केली.यावरून मृतक संगणक चालक विलास येलनारे व अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विनोद खोब्रागडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ४३८ नुसार चंद्रपूर जिल्हाधिकारी गौडा यांच्यासह १३ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
- Advertisement -

