- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-कर्तव्यावर जात असतांना वाटेतच जंगली डुकराची दुचाकीला धडक बसली.धडक बसताच ग्रामसेवक डांबरी रस्त्यावर पडले.यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गडचिरोली सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.सदरची घटना आज,शनिवार ७ जून रोजी सकाळच्या सुमारास दिभना-अमिर्झा मार्गावर घडली.प्रमोद पुडंलिक घोसेकर वय ५२ वर्षे रा.चनकाईनगर वार्ड क्रमांक-१५ गडचिरोली,असे अपघातात मृत पावलेल्या ग्रामसेवकाचे नाव असून ते भिकारमौशी ग्रामपंचायतीमतध्ये कार्यरत होते.
ग्रामसेवक प्रमोद घोसेकर हे आज सकाळच्या सुमारास दुचाकीने ग्रामपंचायत भिकारमौशी येथे कर्तव्य बजावण्यासाठी निघाले होते.अशातच दिभना गावापासून काही अंतरावर जंगली डुक्कर रस्त्यापलीकडे जात असतांनाच घोसेकर यांच्या दुचाकीला धडकला.यात घोसेकर हे दुचाकीसह मुख्य डांबरी मार्गावर पडले. मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने प्रमोद घोसेकर यांना गडचिरोली सामान्य रुग्णालयात भरती केले.मात्र,अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने काही कालावधीतच उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.
- Advertisement -

