Monday, July 27, 2026
Homeनागपूरअखेर शिक्षणसंस्थेच्या नावाखाली भरलेला 'घोटाळ्यांचा मांडव' होऊ लागला उद्ध्वस्त.!

अखेर शिक्षणसंस्थेच्या नावाखाली भरलेला ‘घोटाळ्यांचा मांडव’ होऊ लागला उद्ध्वस्त.!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कुठलीही पात्रता नसतांना मुख्याध्यापक बनवल्या प्रकरणी कुजबुज सुरू झाली आणि खोलवर रुजलेली मुळे एका झटक्यात बाहेर निघाली.मुन्ना वाघमारेच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.अश्यातच शालार्थ आयडीचा भांडाफोड झाला.त्यातच आता शिक्षणसंस्थेच्या नावाखाली भरलेला ‘घोटाळ्यांचा मांडव’ अखेर पोलिसांनी उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.बोगस दस्तऐवजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे.या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी भंडारा येथून ताब्यात घेतले असून प्रकृतीच्या कारणावरून संस्थाचालकाला नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.या कारवाईमुळे शिक्षणक्षेत्रात व विशेषतः संस्थाचालकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्यामुळे आता शालार्थ आयडी घोटाळ्यातही एसआयटीकडून संस्थाचालकांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.चरण नारायण चेटुले वय ६३ वर्षे,भंडारा असे संबंधित संस्थाचालकाचे नाव आहे.चेटुले भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे राजश्री शिक्षण संस्था व नवोदय शिक्षण संस्था या दोन संस्थांमध्ये अध्यक्ष आहेत.विशेष म्हणजे,ज्या दिवशी ताब्यात घेण्यात आले,त्याच दिवशी चेटुले यांचा वाढदिवस होता. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस.के.बी.उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर, यादवनगरची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने राजश्री शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.पोलिसांनी या घोटाळ्यात पुडके, उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले होते.या प्रकरणात पुडकेच्या कागदपत्रांवर चेटुलेची स्वाक्षरी होती.पोलिसांनी याची खातरजमा केल्यानंतर गुरुवारी रात्री भंडाऱ्यातून चेटुलेला ताब्यात घेतले.त्यांची बायपास सर्जरी झाली असल्याने नागपुरात नेल्यावर अगोदर मेयो व त्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.तेथून सुटी मिळाल्यावर पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे.पोलिसांनी न्यायालयासमोर पोलिस कोठडीची मागणी केली आहे.दरम्यान,शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभागी असलेले काही संस्थाचालक अस्वस्थ झाले आहेत. त्यांना एसआयटीकडून लवकरच चौकशीला बोलविण्यात येणार आहे.अनेक संस्थाचालकांपर्यंत ही माहिती जाताच त्यांचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे आता सुखी जीवनाचे घोटाळ्याने वाटोळे होणार,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!