Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीजंगली डुकराची दुचाकीला धडक; गडचिरोलीच्या जखमी ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू..

जंगली डुकराची दुचाकीला धडक; गडचिरोलीच्या जखमी ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कर्तव्यावर जात असतांना वाटेतच जंगली डुकराची दुचाकीला धडक बसली.धडक बसताच ग्रामसेवक डांबरी रस्त्यावर पडले.यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गडचिरोली  सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.सदरची घटना आज,शनिवार ७ जून रोजी सकाळच्या सुमारास दिभना-अमिर्झा मार्गावर घडली.प्रमोद पुडंलिक घोसेकर वय ५२ वर्षे रा.चनकाईनगर वार्ड क्रमांक-१५ गडचिरोली,असे अपघातात मृत पावलेल्या ग्रामसेवकाचे नाव असून ते भिकारमौशी ग्रामपंचायतीमतध्ये कार्यरत होते.
ग्रामसेवक प्रमोद घोसेकर हे आज सकाळच्या सुमारास दुचाकीने ग्रामपंचायत भिकारमौशी येथे कर्तव्य बजावण्यासाठी निघाले होते.अशातच दिभना गावापासून काही अंतरावर जंगली डुक्कर रस्त्यापलीकडे जात असतांनाच घोसेकर यांच्या दुचाकीला धडकला.यात घोसेकर हे दुचाकीसह मुख्य डांबरी मार्गावर पडले. मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने प्रमोद घोसेकर यांना गडचिरोली सामान्य रुग्णालयात भरती केले.मात्र,अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने काही कालावधीतच उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!