Monday, August 24, 2026
Homeनागपूर'चोर तो चोर वर तोच शिरजोर'...- नागपूर येथील घटना

‘चोर तो चोर वर तोच शिरजोर’…- नागपूर येथील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- स्टंटबाजी करताना एका व्यक्तीने झापड मारलेल्या एका तरुणाला या प्रकाराचा बदला घेणे महागात पडले.त्याच्यासह त्याच्या आईविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लव तुरकर वय १८ वर्षे हुडको कॉलनी,नागपूर असे या स्टंटबाजाचे नाव आहे.सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राजेश ब्रिजवानी वय ३० वर्षे, हुडको कॉलनी  हे त्यांच्या मुलाला दुचाकीवर फिरवत होते.त्यावेळी लव सायकलवर स्टंटबाजी करत होता व तो अचानक ब्रिजवानी यांच्या दुचाकीसमोर आला. यामुळे ब्रिजवानी पडता पडता वाचले.त्यांनी लवला याबाबत जाब विचारला व त्याला झापड मारून निघून गेले.लवने ही गोष्ट त्याच्या घरी जाऊन सांगितली.रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो त्याची आई व आणखी दोन मुलांसह ब्रिजवानी यांच्या घरी पोहोचला.सगळे जण ब्रिजवानी यांना शिवीगाळ करू लागले.लवच्या आईने त्यांना धक्काबुक्की केली व लवने त्यांच्यावर हातातील कड्याने डोक्यावर वार केला.यात ब्रिजवानी जखमी झाले.ते त्याच अवस्थेत जरीपटका पोलिस ठाण्यात पोहोचले.पोलिस त्यांना उपचारासाठी घेऊन गेले.त्यांच्या तक्रारीवरून लव तसेच त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!