- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-आपल्या तीन वर्षीय चिमुकल्याला घेऊन शहराच्या बस आगारात कामानिमित्त गेलेल्या बाप- लेकाचा बस खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार २४ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.रोहित खेडकर वय ३५ वर्षे,रा.कुंभारटोली,भंडारा व त्यांचा ३ वर्षीय चिमुकला रोनक अशी मृतक बापलेकांची नावे आहेत.रोहित हा आरओ प्लांटमध्ये पाणी पुरवठ्याचे काम करत असल्याने आपल्या तीन वर्षीय मुलाला दुचाकीवर बसवून पाण्याच्या खाली कॅन नेण्यासाठी भंडारा शहराच्या एसटी आगारात आला.त्याने दुचाकी बस रॅम्पच्या मागे उभी केली होती,दुचाकीवर मुलगा बसलेला होता.त्यानंतर रोहित कामानिमित्त थोड्या अंतरावर गेला. याच दरम्यान रॅम्पवर उभ्या असलेल्या एसटी बसच्या चालकाने बस मागे घेतली.बस रिव्हर्स घेतल्याने दुचाकी आणि त्यावर बसलेला मुलगा बसच्या चाकाखाली आला. मुलगा धोक्यात आल्याचे पाहून रोहित त्याला वाचवण्यासाठी धावला,मात्र तोही बसच्या मागील चाकाखाली सापडला.यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आगार परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी करीत डेपोमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच भंडारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

