Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरचारचाकी वाहनाचा बर्निंग थरार; क्षणात वाहन जळून खाक.. - सुदैवाने जीवितहानी टळली..

चारचाकी वाहनाचा बर्निंग थरार; क्षणात वाहन जळून खाक.. – सुदैवाने जीवितहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातील रत्नमाला चौकात आज,शुक्रवार १९ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा बर्निंग थरार नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला.वाहनातून धूर निघत असतांनाच वाहन चालकासह अन्य दोघांनी प्रसंगावधान साधत वाहनाच्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आणि क्षणात वाहन जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही घटनेने वाहन मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
एमएच ३१ एफयु ६६७३ क्रमांकाच्या अलक्झर या चारचाकी वाहनाने नागपूर येथील कुटूंबीय चंद्रपूरहून निघाले होते.नागपूरला जात असतांना वाटेतील वरोरा शहराच्या रत्नमाला चौकात चारकी वाहनातून अचानकपणे धूर निघू लागला.वाहनातून धूर निघताच सर्वजण बाहेर पडले.एकाने जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन अग्नीशामक यंत्र हातात घेत नाही, तोच अलक्झर वाहन संपूर्ण आगीत भस्म झाले.वाहन चालकाने प्रसंगावधान साधल्याने मोठी दुर्घटना टळली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!