- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार असल्याने “जे काही करायचे आहे; ते आताच करून घ्यारे बावा” असे म्हणत देसाईगंज तालुक्याच्या विविध रेती घाटांवर अवैध उपशाचा खेळ सुरू झाला आहे. विशेषतः शासकीय वाळू डेपो असलेल्या सावंगी रेती घाटात अवैध उपश्याचा खेळ सुरू असूनही देसाईगंज महसूल विभाग अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत गेल्याने आम्ही जेव्हा माहिती प्रसारित करू किंवा माहिती देऊ, त्याचवेळेस विभागातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे डोळे वटारणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासन स्तरावरून ‘वाळू धोरण’ संदर्भात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या आदेशात अटी, शर्ती व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे रेतीघाटधारकास अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात येते.मात्र,त्याचे तंतोतंत आणि खरोखरच पालन केले जाते काय? वरचा अधिकारी सगळीकडे तर लक्ष घालणार नाही,पण किमान स्थानिक स्तरावरील..यांना तर कुठे काय केले जाते,हे दिसतच नाही,असेच वाटत आहे.बाकीच्यांना बरोबर दिसते,पण काहीजण मुंग गिळून गप्प बसल्याने कसे दिसणार..विशेष म्हणजे, सावंगीच्या वाळू डेपोवर “रेतीचा बलाढ्य साठा अन् शासनाला लाखोंचा घाटा” असे चित्र हल्ली नजरेसमोर दिसून येत आहे.त्यामुळे खरोखरच डेपोवर साठवणूक केलेला वाळूसाठा हा तेवढाच शासनाच्या महसूल विभागाच्या ‘महाखनिज’ या ऑनलाईन प्रणालीवर चढलेला असेल काय?तर याचे उत्तर..सध्या तरी कोड्यातच ठेवावे लागेल.कारण की,जस-जशी माहिती प्रसारित केली जाईल,तस-तशी सुधारणा केली जाणार,हे शंभर टक्के खरे आहे.सावंगी रेती घाटात दूर अंतरापर्यंत नदी पात्रात अवैध रेती उपशाच्या खोल जखमा केल्याचे स्पष्ट निदर्शनास येत असतांनाही कोण अंगाला हळद लावून घेणार म्हणून “जाऊ द्या न आपल्या बापाचे काय जाते?” अशी अनेकांची मनधारणा झाली आहे. त्यामुळेच,तर हल्ली ‘आम भरो पोट भरो’ म्हणणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.अवैध रेतीचा उपसा, नियमांना तिरांजली,अवैध वाळूसाठा व इतर बाबींसंदर्भात यानंतर सरळ-सरळ ‘या’ दिवसापासून कार्यालयासमोर पेंडाल दिसेल,अशी भूमिका घेण्याची वेळ आली आहे.कारण की,झोपेचे सोंग घेऊन जागे असलेल्यांच्या चुट्टीवरून हात फिरवण्याचे काम हल्ली काही लोकसेवकांकडून केले जात असल्याने यापुढे माहिती देण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करणे गरजेचे असल्याचे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
- Advertisement -

