Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरचक्क बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच बँकेला कोट्यवधी रुपयांचा लावला चुना.. - ऑडिट रिपोर्ट वरून...

चक्क बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच बँकेला कोट्यवधी रुपयांचा लावला चुना.. – ऑडिट रिपोर्ट वरून आले लक्षात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या घाट रोड शाखेचे मुख्य व्यवस्थापक यांनी बँकेतील इंटर्नल ऑडिट रिपोर्ट व फ्रॉड मॉनिटरिंग रिपोर्टची पाहणी केली असता बँकेतील तब्बल १ कोटी ६५ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली.बँकेला चुना लावणारे दुसरे कुणीही नसून चक्क बँकेतील सहा कर्मचारी व एक बँकेचा सेवानिवृत्त व्यवस्थापक असल्याचे लक्षात येताच तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४०९,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.नंदेश्वर कृष्णराव मंथापूरकर वय ६३ वर्षे,रा.सिल्व्हर पार्क नं.१,शंकरपूर असे आरोपी सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाचे नाव आहे.त्याच्या सोबत युनियन बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड व कर्ज विभागात कार्यरत आरोपी विनीत ज्ञानेश्वर रोकडे वय ४४ वर्षे,रा.टेलिकॉम कॉलनी,अमरावती,हल्ली मुक्काम काळशेत रोड, पुणे,प्रशांत जगदीश उके वय४० वर्षे,रा.बँक कॉलनी,नारी रोड,नागपूर हल्ली मुक्काम साईनाथ कॉलनी,पांढुर्णा, मध्यप्रदेश),धिरज गजानन गजभिये वय ५४ वर्षे,रा.स्पर्श अपार्टमेंट,भगवाननगर रोड,अजनी,नागपूर,आशिष यशवंत जोगे वय ३९ वर्षे,रा.दयालु हाऊसिंग सोसायटी, जरीपटका, नागपूर,दत्ता वैजनाथ पांचाल,विमल यशवंत जोगे यांनी संगनमत करून क्रेडिट कार्डचा दुरुपयोग करून आपल्या आर्थिक फायद्यासाठी बँकेचे नुकसान करून १ कोटी ६५ लाख १७ हजारांनी फसवणूक केली.या प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाच्या घाट रोड शाखेचे मुख्य व्यवस्थापक संदीप मोतीलाल कुमार वय ४० वर्षे,रा.गोदरेज आनंदम,गणेशपेठ,नागपूर यांनी तक्रार दाखल केल्याने गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!