Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या अटकेचे आदेश....

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या अटकेचे आदेश….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील कुसुंबी गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी अनुसूचित जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.या प्रकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १६ फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश आयोगाने दिले होते.मात्र जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाही.त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या.त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने महासंचालकांना वॉरंट अरेस्ट ऑफ विटनेस पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना २ मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश आयोगाने दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी आदिवासींच्या जमिनीवरील माणिकगड सिमेंट कंपनीच्या अतिक्रमणाच्या मुद्यावरुन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगात धाव घेतली होती.त्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना १६ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते.विनय गौडा यापूर्वी सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी होते.पाच महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपुरात त्यांची नियुक्ती झाली आहे.पाच महिन्याच्या काळात त्यांची कारकीर्द उत्तम राहिली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!