Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात सचिन रामटेके यांनी ईव्हीएम हटावचा नारा देत बेमुदत उपोषणाला केली सुरुवात...

चंद्रपुरात सचिन रामटेके यांनी ईव्हीएम हटावचा नारा देत बेमुदत उपोषणाला केली सुरुवात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनी दिलेला कौल नसून ईव्हीएमने दिलेला विजय आहे; असे मानून विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आंदोलने सुरू केली आहेत.शुक्रवारी ६ डिसेंबरला चंद्रपुरातून ईव्हीएमविरोधात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.काँग्रेसचे परिवहन विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सचिन रामटेके यांनी ईव्हीएम हटाव; असा नारा देत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ईव्हीएमद्वारे घोळ करीत महायुतीने निवडणुका जिंकल्या आहे; त्यामुळे आता ईव्हीएम बंद करीत बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हव्या, यासाठी आपण उपोषण करीत आहो; अशी प्रतिक्रिया रामटेके यांनी दिली.ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे; जर असेच सुरू राहिले तर पुढच्या काळात निवडणुका घेण्याची गरज सत्ताधारी पक्षाला भासणार नाही.कारण ते मशिनद्वारे बहुमत सहजरित्या मिळवू शकतात,विरोधी पक्षाला संपविण्याचा हा भाजप सरकारचा डाव आहे.जोपर्यंत ईव्हीएम बंद होणार नाही; तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे; असाही इशारा रामटेके यांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!