Wednesday, August 12, 2026
Homeदेसाईगंजग्रहण लागले सार्वजनिक शौचालयांना ….-सावंगी गावातील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था…

ग्रहण लागले सार्वजनिक शौचालयांना ….-सावंगी गावातील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथील अगदी ग्रामपंचायतीच्या समोर-समोर असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था होऊन; शोभेची वास्तू बनल्याने; शौचालय ‘उभा व केवळ शोभा’ असे नजरेसमोर दिसूनही सावंगी ग्रामपंचायत प्रशासन एवढे गाढ झोपेत कां? असा प्रश्न निर्माण झाला असल्याने ‘ग्रहण लागले सार्वजनिक शौचालयांना’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

सार्वजनिक शौचालय बांधकामाचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील जणतेंनी नियमित शौचालयांचा वापर करावा,उघड्यावर शौचास बसू नये व हागणदारीमुक्त गाव व्हावा; म्हणूनच सार्वजनिक शौचालये ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ग्रामस्थांकरीता  बांधण्यात येतात.अशातच सार्वजनिक शौचालयांची देखभाल,पाण्याची व्यवस्था,सभोवतालील कचरा व्यवस्थापन व रंगरांगोटी ग्रामपंचायत स्तरावरूनच केली जाते.मात्र एक ते दोन वर्षांनंतर सार्वजनिक शौचालयांना जे ग्रहण लागल्या जाते ते संपताच संपेना..! अशातच अजूनही ग्रहणाच्या चपाट्यातच  शौचालये सापडलेली दिसून येतात. सावंगी येथील सार्वजनीक शौचालयांची आजची परिस्थिती लक्षात घेता एका शौचालय बांधकामास एकदम चकाचक रंगरंगोटी तर दुसऱ्या शौचालय बांधकामास रंगरांगोटी ही नाही.दोन्ही शौचायात साधी पाण्याची सोय नाही,शौचालयाची दारे तुटलेली,अवती-भवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तरीही प्रशासन गाढ झोपेतच असल्याने स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडविण्यात आला असल्याचे दिसून येते.शासनाचे लाखो रुपये खर्च करून आज निकामी स्वरूपातील शौचालयांची अवस्था झाली आहे.

सार्वजनिक शौचालये गावामध्ये उभा व शोभा अशास्थितीत असून अनेकजण दुर्लक्ष करून आपलीच पोळी साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.गावामध्ये इतर अनेक स्वरूपाची कामे ग्रामपंचायत स्तरावरून केली जातात.मात्र सार्वजनिक  शौचालयांकडे दुर्लक्ष केले जात आहे.जाता-येता सर्व नजरेसमोर असूनही जणुकाही माहीतच नसल्यासारखे ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे.सार्वजनिक शौचालयांची अशी अवस्था असेल तर इतर सार्वजनिक परिसरातील ठिकाणांची अवस्था कशी असेल;तरी याकडे गांभीर्याने लक्ष घालून; सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करून; त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून; गावातील शौचालये सर्व सोयी-सुविधायुक्त सुरू करण्यात यावी; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!