नागपूर :-पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीमध्ये तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्याच बंदुकीतून स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची घटना आज,शनिवार १८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.विशाल तुमसरे वय ५० वर्षे,रा.हिंगणा, नागपूर असे गोळी झाडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.गंभीर जखमी पोलीस कर्मचारी सध्या नागपूरच्या एम्स रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. माहितीनुसार,नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर विशाल तुमसरे हे गार्ड ड्युटीवर तैनात होते.आज,शनिवारी सकाळच्या सुमारास पोलीस अधीक्षक पोद्दार हे आपल्या बंगल्यात असतांना त्यांना बंगल्या बाहेर गोळीचा आवाज ऐकू आला.त्यामुळे ते बाहेर पडले असता,विशाल हे रक्ताच्या थारोळ्यात गार्ड रूममध्ये पडलेले दिसून आले.पोलीस अधीक्षक यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपल्या वाहनातून तुमसरे यांना तात्काळ नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. विशाल तुमसरे हे २०२३ मध्ये राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) मधून ग्रामीण पोलिसात बदली होऊन आले होते.तुमसरे हे अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त असल्याची माहिती पुढे आली आहे.त्यांनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केल्याचे कळते. त्यामुळे त्यांची अर्थिकस्थिती ढासळल्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे.
गार्ड ड्युटीमध्ये तैनात पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी; रुग्णालयात मृत्यूशी झुंज..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

