Thursday, September 10, 2026
Homeनागपूरगणपती विसर्जन करताना नदीत पडलेल्या तरुणाचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वाचविले प्राण...

गणपती विसर्जन करताना नदीत पडलेल्या तरुणाचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वाचविले प्राण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गणपती विसर्जन करताना तरुणाचा तोल गेला आणि तो नदीच्या प्रवाहात आल्याने वाहत जाऊ लागला. त्यातच पोटा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतीला धावत सुखरूप नदीच्या पात्रातून बाहेर काढले.ही घटना खापरखेडा (ता.सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहणा शिवारात वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात घडली.
गणपती विसर्जनासाठी भाविकांनी दुपारी रोहणा ता. सावनेर शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या काठावर भाविकांनी गर्दी केली होती.गणपती बाप्पाचे विसर्जन करताना पात्रात उभ्या असलेल्या एका तरुणाचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. स्वतःला सावरण्याच्या आता तो प्रवाहात आल्याने वाहत जात होता.हा प्रकार लक्षात येताच भाविकांनी जोरजोरात मुलाला वाचवा,मुलाला वाचवा, अशी आरडाओरड करायला सुरुवात केली. घटनास्थळापासून ३५० मीटर अंतरावर याच नदीच्या काठावर पोटा-चकणापुर, ता.सावनेर या गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतची विहीर आहे. ग्रामपंचायत कर्मचारी तिथे विहिरीच्या दुरुस्तीचे काम करीत होते.त्याच प्रवाहात वाहत असलेला तरुण पोटाचे सरपंच पवन धुर्वे यांना दिसला.त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी आसाराम बावणे यांच्या मदतीने विहिरीतील दोर सोडून लगेच त्या तरुणाच्या दिशेने नदीच्या पात्रात फेकला.तरुणाने लगेच दोराचे टोक पकडले आणि पवन धुर्वे व आसाराम बावणे या दोघांनी त्याला पात्राच्या बाहेर ओढले.या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, सरपंच पवन धुर्वे,ग्रामपंचायत सदस्य श्यामप्रीत भारद्वाज यांनी आसाराम बावणे यांचा सत्कार केला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नदीच्या पात्रातून बाहेर काढल्यानंतर काही वेळाने नागरिकांनी त्याला त्याचा परिचय विचाराला. त्याचे नाव रितेश रंगारी वय ३४ वर्षे,रा.पारडी, ता. पारशिवनी आहे.तो वेकोलिच्या चनकापूर ता. सावनेर येथील रिजनल वर्कशॉपमध्ये ट्रकचालक पदावर कार्यरत आहे.रिजनल वर्कशॉपमधील गणपती बाप्पाचे विसर्जन असल्याने नितेश त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत रोहणा येथील कन्हान नदीच्या घाटात आला होता.विसर्जन करताना तोल गेल्याने तो पाण्याच्या प्रवाहात आला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!