- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वडील कामावर जात असल्याने त्यांना ‘बाय बाय’ करण्यासाठी गॅलरीत आलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला.कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नमस्वी प्रकाश मौदेकर असे मृतक चिमुकलीचे नाव आहे.प्रकाश मौदेकर हे अरविंदनगर येथील गल्ली क्रमांक सहा येथे भाड्याने राहतात.ते दररोज सकाळी कामावर जातात.मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता कामावर निघाले असता नमस्वी त्यांना आवाज देण्यासाठी गॅलरीत पोहोचली.तेथून ती स्टीलच्या श्रीलजवळ पोहोचली व त्यावर चढत असताना तिचा तोल जाऊन ती तिसऱ्या माळ्यावरून खाली पडली. ती बेशुद्ध झाली.हे दृश्य पाहून कुटुंबीयांना मोठाच धक्का बसला.तिला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.यशोधरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वडील कामावर जायला निघाले की नमस्वी त्यांना बघण्यासाठी नेहमी घराच्या गॅलरीत येत होती.
- Advertisement -

