Friday, October 16, 2026
Homeनागपूरगडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठविली जाणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठविली जाणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या वतीने जेष्ठ समाजसेवक पद्श्री डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने मोहफुलापासुन दारु निर्मितीचा कारखाना होणार नाही; असे आश्वासन दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठविल्या जाणार नाही; अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली.

यावेळी जेष्ठ समाजसेवक पद्श्री डॉ.अभय बंग,मेंढा येथील ग्राम स्वराज्याचे प्रमुख आदिवासी नेते देवाजी तोफा,माजी आमदार हिरामण वरखेडे,कुरखेडा  येथील शुभदा देशमुख,डॉ.सतीश गुगलवार,वडसा येथील सुर्यप्रकाश गभणे,मुक्तीपदचे संतोष सावळकर, विजय वरखडे,सुबोध दादा तसेच बारा तालुक्यातील दारुमुक्ती संदर्भातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

गडचिरोली जिल्ह्यात ३० वर्षापासून दारुबंदी आहे. राज्य टास्कफोर्स अंतर्गत दारु व तंबाखू मुक्तीसाठी ‘मुक्तीपथ’ हा जिल्हाव्यापी प्रकल्प सुरु झाला आहे. याअंतर्गत दारु व तंबाखू बंदीचे प्रमाण बरेच कमी झाले आहेत.या कारखान्याचा आदेश रद्द करावा; यासाठी जिल्ह्यातील ८४२ गाव,१२ शहरातील ११७ वार्ड,१० आदिवासी इलाका सभा व तालुका महासंघ तसेच ५३ महाविद्यालयातील युवा अशा एकूण ५७ हजार ८९६ नागरिकांच्या सह्या असलेले १ हजार  ३१ प्रस्ताव या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी संजय मीना उपस्थित होते.जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या वतीने डॉ.अभय बंग,उपाध्यक्ष देवाजी तोफा यांनी दारुबंदी संदर्भात मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!