उद्रेक न्युज वृत्त :-यंदाचे मान्सून दहा दिवस अगोदरच आले असून सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.धानपीक, कांदा तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती देखील निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीच वादळी पाऊस पडला आहे.आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये,असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.२७ मे नंतर हवामानात बदलाचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये.काही ठिकाणी पाऊस संदर्भात खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे,असेही कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये- कृषी विभाग
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

