Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरबापरे..! ६२२ शिक्षकांपैकी ७५ शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार तर उर्वरित बोगस.. - आता...

बापरे..! ६२२ शिक्षकांपैकी ७५ शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार तर उर्वरित बोगस.. – आता भंडारा-गोंदियाच्या माजी खासदारांचे बंधू एसआयटीच्या चपाट्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात दररोज नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत.घोटाळ्यात ‘टॉप टू बॉटम’ तत्कालीन उपसचांलकांपासून सर्वच गुंतलेले असून आता ‘ए टू झेड’ एसआयटीच्या(विशेष तपास पथक)चपाट्यात येऊ लागले आहेत.निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी,नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी,छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूरच्या तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना बेड्या ठोकल्यानंतर आता विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे असल्याची विश्वसनीय माहिती आहे.सतीश मेंढे हे भंडारा-गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू असून ते २०१९-२० या काळात नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कार्यरत होते. घोटाळ्यातील अटकेतील अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.यानंतर घोटाळ्याला खतपाणी घालणारे काही शिक्षणाधिकारी,शिक्षण संस्थाचालक,मुख्याध्यापक,बोगस शिक्षक आणि मध्यस्थही एसआयटीच्या टप्प्यात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.या प्रकरणात २०१९ ते २०२५ पर्यंत तयार करण्यात आलेल्या बोगस शालार्थ आयडीचा तपास केला जात आहे.या घोटाळ्यात माजी उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली होती.तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी लिपिक लक्ष्मण मंघाम याला अटक केल्यावर दुसऱ्या दिवशी माजी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना अटक केली.गुरुवारी या प्रकरणात चिंतामण वंजारी यांनाही अटक करण्यात आली.सायबर पोलिसांनी शालार्थ आयडीचा तपास करून त्यातून कोणाच्या कार्यकाळात किती बनावट आयडी देण्यात आले,याचा शोध घेण्यात आला.यात तत्कालीन उपसंचालक वैशाली जामदार आणि माजी सेवानिवृत्त उपसंचालक सतीश मेंढे यांचेही नाव पुढे आले.या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांचेही अटक वॉरंट काढून वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजीनगरातून अटक केली.मेंढे यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गुरुवारी भंडारा येथे गेले होते.तिथे मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाही.याशिवाय त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.त्यातच ६२२ शिक्षकांपैकी ७५ शिक्षकांची नियमानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.उर्वरित ५४७ शिक्षक बोगस आहेत.या शिक्षकांकडून नियुक्तीसाठी २० ते २५ लाख रुपये घेण्यात आल्याचे एसआयटीच्या तपासात आतापर्यंत समोर आले आहे.सरासरी २० लाख रुपये केल्यास हा आकडा १०० कोटी रुपयांच्या वर जातो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!