Friday, August 7, 2026
Homeदेसाईगंजखाजगी व्यापाऱ्यांना धान्य विक्री करण्यापूर्वी; उन्हाळी धान्य खरेदी केंद्रे सुरू करा-ओबीसी काँग्रेसचे...

खाजगी व्यापाऱ्यांना धान्य विक्री करण्यापूर्वी; उन्हाळी धान्य खरेदी केंद्रे सुरू करा-ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- शासनस्तरावरून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव मिळावा; यासाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्रांच्या माध्यमातून धान खरेदी केला जातो.सध्याच्या घडीला देसाईगंज तालुक्यातील रब्बी उन्हाळी धान पिकाची मोठ्या प्रमाणात कापणी व मळणी जोमात सुरू झाली आहे.मात्र शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने मळणी केलेले धान पीक धान्य खरेदी केंद्रा अभावी खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात विक्री करावी लागत आहे.त्यामुळे शासनाने देसाईगंज तालुक्यातील लवकरात-लवकर उन्हाळी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरू करावे; अशी मागणी ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.

तालुका परिसरात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान उत्पादक शेतकरी वर्ग आहे.शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच महागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणे न परवडणारे झाले आहे.लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी होत असल्याने कर्जाचे डोंगर उभे येऊन ठाकले आहे.अशातच सततची नापिकी,किडीचा प्रादुर्भाव,अवकाळी पाऊस तसेच इतर समस्या शेतकऱ्यांना नेहमी भेडसावत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.हल्ली धान कापणीला वेग आला असून मळणी सुरू झाली आहे.मळणी नंतर अनेक शेतकऱ्यांकडे धान्य साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात नेहमीच खाजगी व्यापाऱ्यांना धान्य विक्री करावी लागत असते.त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळेच शेतकरी आत्महत्या व इतर प्रकरणे उत्कर्षाणे सामोरे येऊ लागले आहेत.अशी प्रकणे थांबणे गरजेचे आहे.याकडे शासनाने जातीने लक्ष घालून खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात शेतकऱ्यांनी धान्य विक्री करण्यापूर्वी; देसाईगंज तालुक्यातील उन्हाळी धान्य खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावी; अशीही मागणी ढोरे यांनी शासनाकडे  केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!