Friday, June 19, 2026
Homeभंडाराक्षुल्लक कारणावरून बाराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या...

क्षुल्लक कारणावरून बाराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-क्षुल्लक कारणावरून मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना डोंगरला येथे काल, गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.आयुष सुखलाल बघेले वय १७ वर्षे,रा.डोंगरला, असे मृताचे नाव आहे.त्याच्या आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम आहे.
आयुष हा तुमसर येथील इंदुताई शाळेतील विज्ञान शाखेच्या १२ व्या वर्गाचा विद्यार्थी होता.आयुष बघेले हा गुरुवारी तुमसर येथे महाविद्यालयात गेला होता. दुपारी १२:३० ते १ वाजे च्या दरम्यान तो महाविद्यालयातून डोंगरला येथील राहत्या घरी परतला.काही वेळ घरात घालवल्यानंतर तो दुसऱ्या माळ्यावर गेला.अभ्यासाकरिता तो वरच्या खोलीत जायचा.मात्र,घटनेच्या दिवशी उशिरापर्यंत खाली न आल्याने घरच्यांनी जाऊन बघितले असता आयुष दोराच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केले.
घनांमध्ये वाढ👇
आणखी एकजण एका अश्लील फेक कॉलचा बळी पडून तुमसर येथील पिंकू ऊर्फ शांतनू शिवबालक चाचिरे वय ३२ वर्षे,रा.तिलक वॉर्ड,देव्हाडी याने  माडगी पुलावरून वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली होती.९ दिवसांचा कालावधी लोटूनदेखील पिंकूचा मृतदेह अद्यापही करडी पोलिसांना गवसला नाही.त्यात अल्पवयीन आयुषच्या आत्महत्येमुळे तालुक्यात अनुचित घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.आयुषने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमध्ये तांत्रिक फ्रॉड,शाळेचे अँगल,मित्रांच्या सहवासातील नजीकच्या घटना या सर्व बाबी तुमसर पोलिस तपासात घेणार असल्याची माहिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!