Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथे महाविकास(इंडिया)आघाडीच्या भव्य-दिव्य रॅलीचे आयोजन…-नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद.. त्यांचा पराभव निश्चित…महाविकास...

कोंढाळा येथे महाविकास(इंडिया)आघाडीच्या भव्य-दिव्य रॅलीचे आयोजन…-नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद.. त्यांचा पराभव निश्चित…महाविकास आघाडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/ सत्यवान रामटेके

कोंढाळा(देसाईगंज) :- देसाईगंजतालुक्याच्या कोंढाळा गावामध्ये काल,दिनांक-१२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास महाविकास (इंडिया)आघाडीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा  क्षेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या निवडणुक प्रचारार्थ महाविकास(इंडिया)आघाडीच्या वतीने संपूर्ण गावामध्ये भव्य-दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार संपूर्ण महाविकास (इंडिया)आघाडीचे पदाधिकारी,मान्यवर,बालगोपाल, वयोवृध्द,महिला मंडळी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.सदर रॅलीच्या निमित्ताने “अबकी बार,बिजेपी सरकार हद्दपार” असे नारे लावून गावातील संपूर्ण परिसर गुंजित होते.नवीन देऊळ हनुमान मंदिर,जुना देऊळ हनुमान मंदिर,मुख्य चौक ते नवनगर टोली समाज वॉर्डातून सदर रॅली निघून आजमितीस एक अनोखा वा आगळा-वेगळा प्रकार प्रचारार्थ अनुभवयास मिळाला आहे.पूर्वी केवळ चारचाकी वाहन घेऊन वा एखादी प्रचार गाडी घेऊन समोरील चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजयी करा; असे म्हटले जात होते.मात्र हल्ली निवडणूक प्रचाराचा ट्रेण्ड बदललेला असल्याचे दिसून येत आहे.अशातच गावातील मुख्य चौकात ढोल-ताशांच्या गजरात महाविकास(इंडिया)आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की,एखाद्याच्या नावात जरी नेते असेल परंतु नेता हा नेताच असतो; आजमितीस केवळ आपलीच पोळी शेकण्याचा अनेकांनी प्रयत्न केला असल्याने त्यांना त्यांची खरी जागा दाखविणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा पराभव हा निश्चित असल्याने अनेकजण कावरे-बावरे होऊन “मू मे राम व बगल मे छुरी”असे करतांना दिसून येत आहेत.त्यानंतर उपस्थित महाविकास(इंडिया)आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त करून भाजपाची पोलखोल केली.

प्रसंगी महाविकास(इंडिया)आघाडीचे परसराम टिकले,नितीनभाऊ राऊत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट)देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितीज उके,शहराध्यक्ष अशोक माडावार,ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम,ज्येष्ठ पत्रकार राजरत्न मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ कुंभलवार,सदस्य संदीप वाघाडे,रोशन शेंडे,आक्रोश शेंडे, कुरुडचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुलाराम लाकडे,भास्कर वाटकर, वसाखे,मोहुर्ले,सीताराम धोटे,केशव शेंडे,गुरुदास बनसोड,गावातील तसेचमहाविकास(इंडिया)आघाडीचे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!