Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरबांधकाम केले नालीचे अन् ठराव झाला गट्टूचा…-ग्रामपंचायतीचा अजब-गजब कारभार…

बांधकाम केले नालीचे अन् ठराव झाला गट्टूचा…-ग्रामपंचायतीचा अजब-गजब कारभार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल(चंद्रपूर) :- तालुक्यातील येरगाव येथील उपकेंद्र इमारतीच्या दुरुस्तीचे कंत्राट मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने गट्टूचा ठराव केला.जेव्हा कंत्राट मंजुरीला प्रस्तावित करण्यात आले, तेव्हा गट्टू लावण्याचे काम तर २ ते ३ लाखांत पूर्ण होत असल्याने त्यात खाडाखोड करून नाली दुरुस्ती जोडण्यात आली.ठरावाच्या तारखेत खाडाखोड करून मिळवलेल्या कंत्राटदारांचे बिल चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आरोग्य उपकेंद्र,येरगाव येथील दुरुस्तीचे काम मागील वर्षीच १५ लाख रुपये खर्च करून करण्यात आले.असे असले तरी पैसे कमविण्याच्या नादात ग्रामपंचायतीने पुन्हा दुरुस्तीचा ठराव जिल्हा परिषद,चंद्रपूरच्या जिल्हा आरोग्य विभागाकडून मंजूर करून घेतल्याचे दिसून येते.या कामाला जिल्हा परिषद,चंद्रपूरने १ ऑगस्ट २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली.हे काम १२ लाख ५३ हजार ४०६ रुपयांचे आहे.

ग्रामपंचायतीचा ठराव गट्ठ लावण्यासंदर्भात असताना व यापूर्वीच उपकेंद्राची दुरुस्ती करण्यात आली असताना पुन्हा याच उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी ठराव करण्यात आला.मात्र, किंमत कमी असल्याने जुन्याच ठरावाच्या तारखेत खाडाखोड करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला व तो मंजूरही करण्यात आला.खाडाखोड करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये ग्रामपंचायतीचा मासिक ठराव, देखभाल-दुरुस्ती प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, गावठाण प्रमाण- पत्राचा समावेश आहे. खाडाखोड करून सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी होणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!