- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-‘एक राज्य,एक गणवेश’ या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना राज्यसरकार कडून गणवेश मिळणार होते.परंतु शाळा सुरू होऊन बरेच महिने लोटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नसल्याची सगळीकडेच ओरड सुरू होती.अशातच आता शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात येत आहे. देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ते ७ वीच्या
विद्यार्थ्यांना नुकतेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पवन खोब्रागडे यांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.
शालेय गणवेशाचा ठावठिकाणा नसल्याने परिणामी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षक वैतागले होते.आता गणवेशाचे वितरण करण्यात आल्याने शिक्षकांनी तसेच पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
शालेय गणवेशाचे वितरण करतेवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पवन खोब्रागडे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नितेश पाटील,शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,शिक्षक संतोष टेंभुर्णे,सुरेश आदे,शिक्षिका रामगुंडे तथा शिक्षकवृंद उपस्थित होते.
- Advertisement -

