Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजकुरुड येथे डांबरीकरण रस्त्याचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन...-कुरुड वासियांचा मार्ग...

कुरुड येथे डांबरीकरण रस्त्याचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन…-कुरुड वासियांचा मार्ग होणार सुकर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून उत्तरेस गडचिरोली मार्गे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड गावामध्ये प्रस्थान होणाऱ्या मुख्य मार्गावरील डांबरीकरण रस्त्याचे आज,शुक्रवार दिनांक-२० सप्टेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला.
कित्तेक दिवसांपासून कुरुड गावामध्ये प्रस्थान होणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली होती.कुरुड गावापासून तालुका मुख्यालय अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असून गावातील नागरिकांना विविध कामांकरिता तालुका मुख्यालय गाठावे लागते. अशातच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने गावातील तसेच परिसरातील नागरिकांना आवागमन करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.सदरची बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या लक्षात येताच; त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागास अवगत करून तात्काळ कुरुड गावातील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गजबे यांच्या मागणीची दखल घेत कुरुड गावातील ऍप्रोज रस्त्याचे डांबरीकरण करण्यास मंजुरी देत आज शुक्रवारी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली.कुरुड गावातील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आल्याने आवागमन करण्यास सदर मार्ग सुकर होणार असल्याने आमदार कृष्णा गजबे यांचे गावकरी तसेच परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहे.
याप्रसंगी भूमिपूजनाला विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,भाजपा देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी,कुरूड ग्रा.पं.सरपंचा प्रशालाताई गेडाम, उपसरपंच क्षितीज उके,देसाईगंज पं.स.माजी उपसभापती अर्चनाताई ढोरे,ग्रा.प.सदस्य शंकर पारधी, ग्रा.पं.सदस्य अविनाश गेडाम,ग्रा.पं.सदस्य विलास पिलारे,ग्रा.पं.सदस्य पलटू दास मडावी, ग्रा.पं.सदस्या रेखाताई मडावी, ग्रा.पं.सदस्या प्रतिमा उके, परसराम निमजे,सदानंद ठाकरे,रमेश ठाकरे,रामचंद्र ठाकरे,दादाजी नाकतोडे,श्रीराम चौधरी,अरुण राऊत, भरत ढोरे,अखिल निसार,विकास पारधी,मनोज दोनाडकर,प्रदीप उरकुडे, शेषराव फटिंग, उमेश ढोरे, अरुण आठवले, डाकराम आठवले,नामदेव मिसार, किशोर ढोंगे,आदित्य मिसार व कुरुड येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!