Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा’ चे आभासी पद्धतीने उद्घाटन..

गडचिरोली येथे ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा’ चे आभासी पद्धतीने उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील युवक व युवतींनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातील प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले कौशल्य विकसित करण्याचे व रोजगारक्षम बनण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील १३ व राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा’ चे वर्धा येथून आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्व केंद्रावर विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात सुरू असलेल्या थेट प्रक्षेपणाला जिल्हाधिकारी संजय दैने,विद्यापीठाचे कुलगूरू डॉ.प्रशांत बोकारे,जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे आष्टी येथून आमदार डॉ देवराव होळी,आरमोरी येथून आमदार कृष्णा गजबे व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ सुरू करण्यात आलेली महाविद्यालये👇
केवळरामजी हरडे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर चामोर्शी, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी,एडवोकेट एन.एस.गंगुवार कॉलेज ऑफ एज्युकेशन गडचिरोली,  श्री.एम.एस.कोवासे कॉलेज ऑफ फार्मसी गडचिरोली,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली,गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज,महात्मा गांधी आर्ट्स,सायन्स अँड लेट एन.पी.कॉमर्स कॉलेज,राजे धर्मराव आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अल्लापल्ली,श्री.किसनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड तालुका आरमोरी, श्री.सद्गुरु साईबाबा सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टी, महिला महाविद्यालय गडचिरोली,श्री.जे.एस.पी.एम. आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धानोरा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!