Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजकुरुड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार चालविणाऱ्यावर कठोर कारवाई करा…-मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांना...

कुरुड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार चालविणाऱ्यावर कठोर कारवाई करा…-मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांना तक्रार केली सादर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कुरुड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार चालविणाऱ्या ग्रामविकास अधिकारी संजय चलाख यांच्यावर सखोल चौकशी करुन कठोर कारवाही करण्यात यावी; यासंदर्भात ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच सदस्य मिळून गटविकास अधिकारी पंचायत समिती देसाईगंज यांच्या मार्फतीने मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांना तक्रार सादर करून चलाख यांचा पाढा वाचला आहे.

सदर दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,ग्रामपंचायत कुरुड येथील कार्यरत ग्रामविकास अधिकारी हे बहुतेक मासिक सभेला जाणुन बुजुन गैरहजर असतात व ग्रामपंचायत कुरुड अंतर्गत होणारा मासिक खर्च सादर करित नाही.त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत आलेल्या शासकीय निधीचा गैरवापर करण्यात आला आहे.अशी शक्यता नाकरता येत नाही.त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामनिधी, पाणीपुरवठा व १५ वित्त आयोग योजनेचा जमा खर्च याची सखोल चौकशी करण्यात यावी.शासनाकडुन गाव विकासासाठी १५ वित्त आयोग अंतर्गत दरवर्षी निधी देण्यात येते; परंतु ग्रामपंचायत कुरुड येथील सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या आर्थीक वर्षातील निधी आजतागायात काही निधी खर्च करण्यात आलेला नाही.त्यामुळे गावाचा विकास करता आलेला नाही.सदर निधी अखर्चीत ठेवणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाही करण्यात यावी.गाव विकास करिता शासनाकडुन विविध योजनेतुन मंजुर झालेल्या कामाची मासिक सभेत सचिव हे माहिती न देता परस्पर त्या कामांना प्रशासकीय मंजुरी देउन स्वमर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राट देतात.शासकीय आदेशानुसार ३१ मे ला देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अजुन पर्यंत देण्यात आलेला नाही.सन २०२३-२४ या आर्थीक वर्षात मागासवर्गीय उन्नतीसाठी १५ टक्के निधी खर्च करण्यात आलेला नाही.ग्रामस्तरीय समित्या अजुन पर्यंत नेमण्यात आलेल्या नाही.मागील एक महिण्यापासुन ग्रामविकास अधिकारी सतत गैरहजर असल्यामुळे गावातील लोकांना नाहक त्रास होत आहे.कार्यलयीन वेळात सचिव हे ग्रामपंचायत कार्यालयात सतत गैरहजर असतात.सचिव हे गावातील नागरीकांशी व ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी उध्दटपणाने वागतात.ग्रा.प. कुरुडचे सचिव हे गावाविकासाकरिता नेहमी उदासिन दिसुन येतात व ग्रामपंचायत वसुलीकरिता कुठलाही प्रयत्न करित नाही.ग्रामपंचायत सदस्यांना मासिक सभेत कार्यवाही बुक योजनेचे बँक पासबुक व खरेदी बिल तपासणी करिता उपलब्ध करुन देत नसल्याने सखोल चौकशी करुन ग्रामपंचायत कुरुडचे सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाही करण्यात यावी; अशी मागणी कुरुड ग्रामपंचायतीचे उपसपंच क्षितीज उके,ग्रामपंचायत सदस्य विलास पिलारे,पलटुदास मडावी,रेखा मडावी,प्रतिमा उके सदस्या,प्रिती मडावी सदस्या,प्रविण उईके सदस्य,शंकर पारधी सदस्य, आशा मिसार सदस्या,पुजा डांगे सदस्या इत्यादींनी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!