- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरापासून कोरची मार्गे हाकेच्या अंतरावर असलेल्या सती नदी पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज, शनिवार १९ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.याबाबत अधिक माहिती अशी की,सती नदी किनारी गुरे चराई करणाऱ्या एका गुराख्यास नदी पात्रातील पाण्यात मानवी शरीर तरंगतांना दिसून आला.त्यामुळे तो घाबरला आणि लगतच्या गावात माहिती दिली. घटनास्थळी परिसरातील नागरिकांचा एकच जमाव गोळा झाला. अश्यातच तीन दिवसांपासून कुंभीटोला येथील ५५ वर्षीय पूनाराम महागु सहारे बेपत्ता असल्याची घटना घडली होती.मृतदेहावरील कपड्यांवरून तोच इसम असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सदर घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

